About Us

कोर्टाची पायरी

ती चढावी की चढू नये यावर अनेक लोक बोलतात. पण कित्येकांना कोर्टाची पायरी चढावीच लागते. या पैकी मी एक. जी गोष्ट करावीच लागणार आहे ती आवडीने करायचा स्वभाव. त्यामुळे न्याय मंदिरातील बातमीदाराची हा प्रयत्न ! कायद्याच्या अथांग सागरातील आम्ही फारतर गोताखोर. खोल खोल जायचे आणि हाती लागलेले मोती, रत्न जगाला द्यायचे.कायद्याची परिभाषा कोषाबाहेर आणत सर्वसामान्यांपर्यंत बातमी पोहोचवायची. कुशाग्र, हुशार, अभ्यासू कायदेतज्ज्ञ कायद्याचा कीस पाडत, बुध्दी पणाला लावत नियम, कायद्यातील अडथळे पार करतात. त्यांच्या या मेहनतीला शब्दांचे बळ देण्याचा हा प्रयत्न.प्रत्येक वेळी नानाविध, नानारंगी, बहुउपयोगी, बहुआयामी, बहुढंगी विषय मिळत राहतात. ते फक्त तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न. यात फक्त तुमची साथ हवी.

या बुद्धिवंत प्रातांतील मुशाफिरी तुमच्या बौद्धिक राशीवर नक्कीच प्रभाव टाकतील, प्रेरणा देतील, त्यासाठीच हा गोतामारायचा अट्टाहास. प्रत्येक वेळी नानाविध, नानारंगी, बहुउपयोगी, बहुआयामी नोंदी समोर आणू, फक्त तुमची साथ हवी.